सन्माननिय ग्राहक,

चेक व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आर. बी. आय. ) यांनी सर्व बँकांना दिनांक 01 जानेवारी 2021 पासून पॉझिटिव्ह पे सिस्टिम लागू करण्यास सांगितले आहे.

पॉझिटिव्ह पे सिस्टिम प्रणाली चेक क्लिअरिंग प्रक्रियेस अतिरिक्त सुरक्षा स्तर देऊन सक्षम करते ज्यामध्ये चेक जारीकर्ता खाली नमूद केलेल्या प्रक्रियेनुसार चेक सादर करतो. लाभार्थी जेव्हा चेक क्लिअरिंगसाठी सादर करतात तेव्हा सादर केलेल्या चेकची तुलना बँकेला पॉझिटिव्ह पे सिस्टिम मार्फत देण्यात आलेल्या तपशीलांशी केली जाईल. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी खातेधारक(चेकचा ड्रॉवर) यांना रु. ५०,००० / - किंवा त्याहून अधिक रक्कमेचा चेक देताना खालील प्रमाणे चेकचा तपशील सादर करणे आवश्यक आहे.

अशा चेकचा तपशील सादर करण्यासाठीचा पॉझिटिव्ह पे कन्फर्मेशन फॉर्म हा बँकेच्या शाखा किंवा बँकेची अधिकृत वेबसाईट www.akoladccbank.com या संकेतस्थळावरील मुख्य पृष्ठावर “डाऊनलोड करा” या शीर्षकाखाली उपलब्ध आहे. या फॉर्मवर जारी केलेल्या चेकबाबतची माहिती खालील प्रमाणे नमूद करणे आवश्यक आहे.

१) चेकवरील दिनांक
२) लाभार्थी / प्राप्तकर्त्याचे नाव
३) रक्कम
४) चेक नंबर
५) ट्रानजॅक्शन कोड

आपल्या माहितीकरिता नमूना चेक

पॉझिटिव्ह पे सिस्टिम लिखित फॉर्म बँकेत देण्यासाठी येथूनही डाउनलोड करू शकता.
फॉर्म डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

खातेदार आपले खाते असणाऱ्या शाखेस भेट देऊन विहित नमुन्यातील फॉर्म भरून देऊन अथवा बँकेच्या मोबाईल बँकिंग अँपद्वारे किंवा एस.एम.एस. रिक्वेस्टद्वारे वरीलप्रमाणे तपशील सादर करता येईल.

टीप :

  • अपूर्ण आणि चुकीच्या तपशीलांमुळे चेक परत (रिटर्न) होऊ शकेल याची नोंद घ्यावी.
  • पॉझिटिव्ह पे सिस्टिमद्वारे चेकचे सक्षम प्रमाणीकरण करण्यासाठी, वर नमूद केलेला चेक तपशील चेक प्रेझेंटेशनच्या तारखेच्या एक दिवस आधी बँकेत उपलब्ध असावा.
  • पॉझिटिव्ह पे प्रणालीचे अनुकरण करणारे चेकच केवळ चेक सादर करणाऱ्या आणि चेकचे पेमेंट करणाऱ्या बँकांमधील रिझर्व्ह बॅंकेच्या विवाद निराकरण यंत्रणेमध्ये पात्र ठरतील.
  • हि सुविधा सद्यस्थितीत रू. ५०,०००/- व त्याहून अधिक रक्कमेच्या चेक करिता ऐच्छिक असली तरी खातेदारांनी रु.५,००,०००/- आणि त्यावरील सर्व चेकसाठी ही सुविधा वापरण्याची आरबीआय यांनी शिफारस केलेली आहे.
  • पॉझिटिव्ह पे सिस्टिम बाबत आणखी काही शंका असल्यास आमच्या जवळच्या शाखेत भेट द्या.

पॉझिटिव्ह पे सिस्टिम एस. एम. एस. सुविधा

पॉझिटिव्ह पे सिस्टिम (PPS) सुविधेसाठी चेक जारीकर्ता खातेदारांनी चेक रक्कम रु. 50000/- व त्यावरील चेक करीता त्यांच्या बँकेमध्ये रजिस्टर्ड असलेल्या मोबाईल क्रमांकावरून 8744800300 या नंबरवर खालील प्रमाणे एस.एम.एस. पाठवावा.

एस.एम.एस. चा नमूना :

PPS <Space> <१६ अंकी खाते क्रमांक>-<६ अंकी चेक क्रमांक>-<६ अंकी SAN नंबर>-<२ अंकी ट्रानजॅक्शन कोड>-<८ अंकी चेक दिनांक(DDMMYYYY)>-<रक्कम>-<लाभार्थी / प्राप्तकर्त्याचे नाव>

SMS Format :

PPS<Space> <16 digit a/c no.>-<6 digit cheque no.>-<6 digit SAN no.>-<2 digit transaction Code>-<8 digit Cheque Date (DDMMYYYY)>-<Cheque Amount>-<Payee Name>

Note:- 6 अंकी SAN नंबर माहीत नसल्यास 000000 टाकावा.

उदा. (Example)

PPS 0010112010111111-012345-000000-13-01122020-55250.90-XYZ CO LTD

वरील प्रमाणे एस.एम.एस. पाठविल्या नंतर ग्राहकांना त्यांचा एस.एम.एस. योग्य असल्यास त्या बाबत चा एस.एम.एस. प्राप्त होईल.