आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठी मजबूत आर्थिक पाठबळ!

दि अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक केवळ शेतकरी वर्गापुरती मर्यादित न राहता, लघुउद्योजक, व्यापारी, सेवाभावी संस्था आणि स्वयंरोजगार करणाऱ्यांसाठी देखील आर्थिक विकासाची दारे खुले करत आहे. आपल्या व्यवसायाच्या प्रत्येक टप्प्यावर — सुरुवात असो किंवा विस्तार — आवश्यक असणाऱ्या आर्थिक गरजांसाठी बँक विविध बिगरशेती संस्थात्मक कर्ज योजना सुलभ अटी व नियमांसह उपलब्ध करून देते.

शेती कर्ज योजनेअंतर्गत उपलब्ध सुविधा:

✅ नवीन उद्योग उभारणी, ✅ व्यापार वाढ, ✅ सेवा व्यवसाय विस्तार, ✅ शैक्षणिक संस्था, सहकारी संस्था व सामाजिक उपक्रमांसाठी पायाभूत सुविधा, ✅ वाहतूक व यंत्रसामग्री खरेदी, ✅ गोडाऊन, शॉप, ऑफिस बांधकाम किंवा नूतनीकरणासाठी आर्थिक मदत,

या सर्व गरजांसाठी दि अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आपल्या पाठीशी ठामपणे उभी आहे.
आर्थिक स्थैर्य, विश्वासार्ह सेवा आणि ग्राहक केंद्रित दृष्टीकोन यामुळे बँक आज ग्रामीण आणि शहरी व्यावसायिकांसाठी विश्वासाचं व आर्थिक प्रगतीचं मुख्य आधारस्तंभ बनली आहे.
बँकेचे पाठबळ घेऊन व्यवसायात भरारी घ्या!

अधिक माहितीसाठी: आपल्या जवळच्या दि अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत अवश्य भेट द्या आणि अनुभवा विश्वासार्ह व पारदर्शक सेवा!

अ. क्र. संस्थात्मक कर्जाचे प्रकार कर्ज मर्यादा परतफेड कालावधी व्याजदर
पगारदार सहकारी संस्था कॅश क्रेडिट (संस्थेची बँकेतील अतिरिक्त गुंतवणूक शेअर्स व रिझर्व फंड चे ७०%) १२ महीने ९.००% (उत्तम संस्था “अ” वर्ग) थकीतचे प्रमाण ५% चे आत १०.५०% (इतर साधारण संस्था)
पगारदार सहकारी संस्था मध्यम मुदती (संस्थेची पात्र कर्ज मर्यादा क्षमता व मान्य उपविधी व सभासद कर्ज मर्यादा) ८४ महीने ९.००% (उत्तम संस्था “अ” वर्ग) थकीतचे प्रमाण ५% चे आत ११.००% (इतर साधारण संस्था)
नागरी सहकारी बँकांना ओव्हरड्राफ्ट कर्ज मुदतठेव पावतीच्या रकमेच्या ८५% नुसार येणारी मर्यादा १ वर्ष मुदत ठेव पावतीचे व्याजदर + १%
नागरी सहकारी पतसंस्थाना कॅश क्रेडिट कर्ज वसुल भागभांडवल + रिझर्व्हफंड + इमारत निधी यांचे बेरजेतून साचलेल्या तोटा वजा जाता उर्वरित रकमे पर्यंत येणारी मर्यादा १ वर्ष १३.००%
खरेदी विक्री संस्था - भांडवली परतफेड क्षमतेच्या अधीन राहून प्रकल्प खर्चाचे ६०% पर्यंत ५ वर्ष १३.५०%
खरेदी विक्री संस्था - क्लिन कॅश क्रेडिट स्वत:चे भांडवलातून सरकारी भागभांडवल वजा जाता राहिलेल्या स्वत:चे भांडवला पर्यंत मर्यादा १ वर्ष (नूतनीकरण) १३.५०%
खरेदी विक्री संस्था - हायपोथीकेशन सरकारी भागभांडवल वजा जाता राहिलेल्या स्वनिधीचे ६५% पर्यंत मर्यादा १ वर्ष (नूतनीकरण) १३.५०%
सहकारी जिंनिंग प्रेसिंग संस्था - मध्यम मुदती भांडवली कर्ज उपलब्ध निधी + वसुल भागभांडवल + रिझर्व्हफंड + इमारत निधी यांचे बेरजेतून साचलेल्या तोटा वजा जाता उर्वरित रकमेचे ९०% पर्यंत येणारी मर्यादा ५ वर्ष १३.५०%
सहकारी जिंनिंग प्रेसिंग संस्था कॅश क्रेडिट कर्ज परतफेड क्षमतेच्या अधीन राहून आवश्यकतेनुसार १ वर्ष (नूतनीकरण) १३.५०%
सहकारी जिंनिंग प्रेसिंग संस्था - मध्यम मुदती कर्ज ५०% तारण किंवा शासन हमी प्रमाणे ५ वर्ष १३.५०%
सहकारी जिंनिंग प्रेसिंग संस्था - दिर्घ मुदती भांडवली कर्ज प्रकल्प खर्चाचे ७५% पर्यंत कर्ज (अनुदान रकमेचा समावेश राहील) ९ वर्ष १३.५०%
मत्स व्यवसाय करीता कॅश क्रेडिट कर्ज प्रकल्प खर्चाचे ७५% पर्यंत किंवा मालमतेचे मुल्यांकनाचे ५०% पर्यंत कर्ज १ वर्ष (नूतनीकरण) १३.५०%
प्राथमिक / वि.का. सह. सोसाट्याना कार्यालय इमारत बांधकाम कर्ज परतफेड क्षमतेच्या अधीन राहून प्रकल्प खर्चाचे ८५% पर्यंत कर्ज देता येईल २५ वर्ष ८.५०%
खरेदी विक्री संस्था - प्लेज कर्ज संस्थेच्या उपलब्ध निधीच्या १६ पट किंवा ६५% कमी असणाऱ्या रकमे पर्यंत १ वर्ष (नूतनीकरण) १३.५०%