पारितोषिके
पुरस्कार
०१. बँकिंग सेवेमध्ये यशस्वीरित्या १०० वर्षे पूर्ण केल्याबद्दल बँकेचा दि. २६ नोव्हेंबर २०२४ रोजी आयोजीत नॅशनल फेडरेशन ऑफ स्टेट को-ऑप. बँक्स लि., च्या हिरकमहोत्सवी सोहळा व जागतीक सहकार परिषद, नवी दिल्ली येथे मा. केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री मा. अमित शाह यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.
०२. महाराष्ट्र राज्य शासनाचे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) या योजने अंतर्गत सन २०२३-२०२४ करीता जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट कामगीरी बद्दल मा. जिल्हाधिकारी अकोला यांनी प्रथम क्रमांकावर सन्मानचिन्ह देऊन बँकेचा गौरव केला आहे.
०३. महाराष्ट्र राज्य शासनाचे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) या योजने अंतर्गत उत्कृष्ट काम केल्याबाबत मा.जिल्हाधिकारी अकोला यांनी बँकेला प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले.
०४. भारत सरकार, नाबार्ड व नॅफस्कॉब यांच्या विद्यमाने दिनांक १२ ऑगस्ट २०२२ रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे आयोजित ग्रामीण सहकारी बँकेच्या राष्ट्रीय परिषदेमध्ये केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री मा.अमित शाह यांचे हस्ते बँकेने क्रेडिट आणि बँकिंग सुविधेमध्ये १०० वर्षे यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल बँकेचा सन्मान करण्यात आला.
०५. जुन २०२२ मध्ये आज़ादी का अमृत महोत्सवाचे पर्वावर भारत सरकार पुरस्कृत सन्मानामध्ये वित्तीय संव्यवहार विवरण (Statement of Financial Transaction) मुदतीत व अचुक भरल्याबद्दल बँकेला आयकर विभाग आयकर निदेशक (आसुचना एवं आपराधिक अन्वेषण) नागपूर यांचे द्वारा सन्मानीत करण्यात आले.
०६. दि. ३१ मार्च २०२१ पर्यंत वस्तु व सेवा कर(जीएसटी) चे भुगतान व विवरण पत्र भरणेचे कामकाज तत्परतेने केल्या बाबत भारत सरकार वित्त मंत्रालय यांचे दि सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टमर कन्व्हेन्स द्वारा प्रशंसा प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
०७. नगर अर्बन को.ऑप.बँक निवृत्त सेवक संघ, अहमदनगर, यांनी बँकेच्या शतकोत्तर वाटचालीचा विशेष गौरव करतांना रावबहादूर गणेश कृष्ण चितळे पुरस्कार देवून बँकेला दि. २५ नोव्हेंबर २०१८ रोजी सन्मानीत केले.
०८. बँकेला सन २०१५, २०१६ व २०१७ मध्ये उत्कृष्ट जिल्हा बँक म्हणून बँको पुरस्कार प्राप्त झाले आहे.
०९. बँकेला दि महाराष्ट्र राज्य असोसिएशन लि., मुंबई यांचा ''शतकोत्तर वाटचाल विशेष सन्मान'' दि.28 फेब्रुवारी 2016 ला स्वातंत्रवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृह, शिवाजी पार्क मुंबई येथे मा.एन.एस.विश्वनाथन, एक्झिक्युटिव्ह डायरे्क्टर आर.बी.आय., नॅशनल फेडरेशन ऑफ को.ऑप बँक दिल्लीचे अध्यक्ष डॉ.मुकूंद अभ्यंकर यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.
१०. बँकेला ऍ्सेस डेव्हलपमेंट सर्व्हीसेस, जि.आय.झेड व नाबार्ड यांचे संयुक्त विद्यमाने आय. टी. ऍन्ड इम्प्लीमेटेंशन ऑफ आय.टी. या प्रवर्गा अंतर्गत ''इनक्ल्युजीव फायनान्स इंडिया अवार्ड 2014'' हा राष्ट्रीयस्तरावरील पुरस्कार दि.9.12.2014 रोजी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला.
११. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) चे ३३ व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून नाबार्ड महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालय पुणे यांनी सन २०१४ मध्ये सन्मानित केले.
१२. बँकेला दि.१६.०१.२०१४ रोजी महाराष्ट्र शासनाचा सहकार निष्ठ पुरस्कार मा. ना. पृथ्वीराज चव्हाण, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, ह्यांचे हस्ते नागपुर येथे प्रदान करण्यात आला.
१३. सन २०१२ मध्ये बँकेला बँकिंग फ्रंटीयर्स चा कोअर बँकींग सोल्युशन अवार्ड मिळाला.
१४. सन १९९३-९४, १९९५-९६, १९९६-९७, १९९७-९८, २०२१-२२, २०२३-२४ अशा सहा वेळा महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन मुंबई द्वारा देण्यात येणारा वैकुंठभाई मेहता सर्वोत्कृष्ठ बँक पुरस्कार बँकेला प्राप्त झाला.
बँकेच्या पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कार्य-गुणांमुळे राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय संस्थांनी त्यांचा कार्यगौरव केला आहे.
०१. दि इकॉनॉमीक टाईम्स यांचे द्वारा दि. २६ व २७ सप्टेंबर २०१८ रोजी नवी दिल्ली येथे आयोजित ६ व्या रूरल स्ट्रॅटेजी समिट मध्ये बँकेचे मा. अध्यक्ष महोदय, डॉ. संतोषकुमार वा. कोरपे यांनी अमुल्य मार्गदर्शन केल्या बाबत प्रशंसा प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
०२. श्री. अनंत वैद्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कै.बापुरावजी देशमुख उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अधिकारी म्हणून उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी या श्रेणीतून सन २०१७ करीता सन्मानीत करण्यात आले. सदर पुरस्कार हा दि महाराष्ट्र हा दि महाराष्ट्र स्टेट को. ऑप बँक असोसिएशन लि., मुंबई यांचेकडून देण्यात आला.
०३. मा.डॉ.संतोषकुमार वा. कोरपे, बँकेचे विद्यमान अध्यक्ष "बेस्ट चेअरमन म्हणून फ्रंटीयर्स इन को.ऑपेरेटीव बँकिंग अवार्ड २०१४" ने सन्मानित करण्यात आले.
०४. सहकार महर्षी डॉ.श्री.अण्णासाहेब कोरपे बँकेचे माजी अध्यक्ष - जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत सन २००५.
०५. डॉ. श्री. संतोषकुमार कोरपे, बँकेचे विद्यमान अध्यक्ष - विजयरत्न पुरस्काराने सन्मानीत, सन १९९३.
०६. श्री.वामनरावजी देशमुख, बँकेचे माजी उपाध्यक्ष - वसंतराव नाईक कृषी पुरस्काराने सन्मानीत सन २००८.
०७. डॉ. श्री. सुभाषचंद कोरपे, बँकेचे माजी अध्यक्ष - गॅस्ट्रोएन्टरॉलॉजीचे कॉलेज ऑफ अमेरीकाचे विद्यमान संचालक. आंतराष्ट्रीय संबंध समितीवर अध्यक्ष म्हणून निवड सन २००८-०९.
०८. ॲड. अरविंद तिडके , माजी संचालक तथा माजी व्यवस्थापकीय संचालक - कै. बापुरावजी देशमुख उत्कृष्ठ सहकारी बँक अधिकारी पुरस्काराने सन्मानीत
०९. श्री. बाळकृष्ण जे. काळे ,सरव्यवस्थापक - कै. बापुरावजी देशमुख उत्कृष्ठ सहकारी बँक अधिकारी पुरस्काराने सन्मानीत.
१०. श्री. आर. एस. बोडखे, माजी व्यवस्थापक - कै. बापुरावजी देशमुख उत्कृष्ठ सहकारी बँक अधिकारी पुरस्काराने सन्मानीत.
११. सौ. आशाताई मु. सावरकर - कै. बापुरावजी देशमुख उत्कृष्ठ सहकारी बँक कर्मचारी पुरस्काराने सन्मानीत, सन २००५.
१२. श्री. शरद ना. वानखडे - कै. बापुरावजी देशमुख उत्कृष्ठ सहकारी बँक कर्मचारी पुरस्काराने सन्मानीत, सन २००६.
१३. श्री. राजाभाऊ पाथ्रीकर - कै. बापुरावजी देशमुख उत्कृष्ठ सहकारी बँक कर्मचारी पुरस्काराने सन्मानीत.
१४. श्री. वसंतराव गो. हिंगणकर - कै. बापुरावजी देशमुख उत्कृष्ठ सहकारी बँक कर्मचारी पुरस्काराने सन्मानीत, सन २००५.
१५. श्री. प्रदिप ए. बाजड - कै. बापुरावजी देशमुख उत्कृष्ठ सहकारी बँक कर्मचारी पुरस्काराने सन्मानीत, सन २००९.