वैयक्तिक बँकिंग
दि अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि, अकोला आपल्या ग्राहकांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि सोयीस्कर वैयक्तिक बँकिंग सेवा प्रदान करण्यास सदैव कटिबद्ध आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन बँकेने ठेव योजना, बचत खाते, चालू खाते, कर्ज योजना आणि डिजिटल बँकिंगसारख्या विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
ग्राहकांच्या आर्थिक स्थैर्याला आणि गरजांना साथ देणारी वैयक्तिक बँकिंग सेवा ही बँकेच्या सेवेचा मुख्य आधार आहे. ग्राहकांसाठी त्वरित व्यवहार, पारदर्शक सेवा व तत्पर सहाय्य यामुळे बँकेवर विश्वासाने व्यवहार करणाऱ्या ग्राहकांची संख्या सातत्याने वाढत आहे.
आमच्या वैयक्तिक बँकिंग सेवा आणि सुविधा:
✅ सर्व शाखांमधून व्यवहार करण्याची सुविधा: आपल्या खात्याचा व्यवहार कोणत्याही शाखेतून सोयीस्करपणे करता येतो.
✅ मोबाइल बँकिंग सेवा: घरबसल्या बँकिंगचा आनंद!
✅ रूपे डेबिट कार्ड: ए.टी.एम. व शॉपिंगसाठी देशभर व्यवहारसुलभ कार्ड.
✅ R.T.G.S / N.E.F.T. सेवा: जलद व सुरक्षित फंड ट्रान्सफरची सुविधा.
✅ ए.टी.एम. सेवा: २४x७ रोख रक्कम काढण्याची सोय.
✅ एस.एम.एस. अलर्ट सेवा: व्यवहाराची तात्काळ माहिती थेट आपल्या मोबाईलवर.
✅ लॉकर सेवा: निवडक शाखांमध्ये आपले मौल्यवान दस्तऐवज व दागिने सुरक्षित ठेवण्याची सोय.
✅ ठेव योजना: बचत खाते, आवर्ती ठेव आणि मुदत ठेव यासह आकर्षक व्याजदरावर गुंतवणुकीची संधी.
✅ सोने तारण कर्ज सुविधा: आपल्या सोन्यावर त्वरित आणि सोयीस्कर कर्ज.
✅ शेतकरी, कर्मचारी व व्यवसायिकांसाठी कर्ज योजना: गरजेनुसार किफायतशीर व्याजदरावर कर्ज सुविधा.
✅ AePS: Aadhaar Enabled Payment System सुविधा
अधिक माहितीसाठी: आपल्या जवळच्या दि अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत अवश्य भेट द्या आणि अनुभवा विश्वासार्ह व पारदर्शक सेवा!
आवश्यक दस्तऐवज:
✅ रंगीत फोटो (3 संख्या)
✅ पॅन कार्ड / form 60
✅ पत्त्याचा पुरावा: आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हींग लायसन्स(वाहन चालविण्याचा परवाना), मनरेगाचे जॉब कार्ड, पासपोर्ट, मागील महिन्याचे टेलिफोन बिल/ विज बिल
✅ ओळख पुरावा: आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हींग लायसन्स(वाहन चालविण्याचा परवाना), मनरेगाचे जॉब कार्ड, पासपोर्ट